पुण्यात स्कुलबस चालकाला पोलिसांनी गुडघ्यावर चालवले

पुण्यात स्कुलबस चालकाला पोलिसांनी गुडघ्यावर चालवले

गरिब टेम्पो चालकाला मारहाण करीत केली होती तोडफोड

marathinews24.com

पुणे – गरिब टेम्पो चालकाला मारहाण करीत त्याच्या वाहनाची काच फोडून नुकसान करणार्‍या मस्तवाल स्कुल बस चालकाची हडपसर पोलिसांची काही तासात अटक केली. त्याची धिंड काढून गुडघ्यावर चालवित माझी चुक झाली, पुन्हा अशी गफलत करणार नाही, मला माफ करा असे वदवून घेत पुण्यात कायद्याचेच राज्य असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटीझन्सनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. रमेश पाटील (वय ३२ रा. पिंपरी चिंचवड) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे.

कात्रज भागात तरुणाच्या खूनाचा उलगडा; आरोपी गजाआड – सविस्तर बातमी 

मगरपट्टा ब्रिजजवळ स्कुलबस चालकाने ( एम.एच.१४ एम.एम. ९८३७ ) वाहन बेदकारपणे चालवले. त्यानंतर त्याने टेम्पो चालकाला अडवून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच बसमधील लोखंडी टामीने टेम्पोची काच तोडुन नुकसान केले होते. ही घटना ९ ऑक्टोबला दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणाचा एका नागरिकाने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. स्कुलबस चालकाने सार्वजनीक रत्यावर दहशत निर्माण केल्याचे व्हिडिओतून दिसून आले होते. त्यानुसार टेम्पो चालकाने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकाला आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा पत्ता शोधून काढला. काही तासात आरोपी स्कुलबस चालक रमेश पाटील याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला घटनेच्या ठिकाणी नेउन थेट गुडघ्यावर बसवून चालायला भाग पाडले. माझी चुक झाली, पुन्हा अशी चुक घडणार नाही, मला माफ करा अशी याचना आरोपीने केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हडपसर पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर सोशल मीडियावर नेटीझन्सनी प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या पथकाने केली.

पुण्यात दादागिरी खपवून घेणार नाही

नागरिकांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच केले होते. त्याचअनुषंगाने हडपसर पोलिसांनीही मस्तवाल स्कुलबस चालकाची दहशत मोडीत काढली. गरिब टेम्पो चालकाला मारहाण करीत त्याच्या वाहनाची काच फोडल्याप्रकरणी बसचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तोडफोडीचे नुकसान भरपाईही वसूल केली आहे.

शहरात भाईगिरीच्या जोरावर दहशत निर्माण करणार्‍या कोणत्याही गुंडाला आम्ही सोडणार नाही. त्याच्याविरूद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यास प्राधान्य दिले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार हद्दीतील शांतता कायमस्वरूपी प्रस्थापित करणे हेच ध्येय आहे. – संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×