Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

दिवाळीत नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री

उपायुक्त कृषीकेश रावलें

३ पादत्राणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे

marathinews24.com

पुणे – दिवाळीत पादत्राणे निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला.कंपनीतील अधिकाऱ्यांनी माहिती पोलिसांना दिल्यानंतर रास्ता पेठेतील तीन पादत्राणे विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई केली. संबंधित कारवाईत १ लाख १० हजार रुपयांचे बनावट पादत्राणे जप्त करण्यात आले. पादत्राणे विक्री करणाऱ्या तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, ८ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी

पादत्राणे निर्मिती करणाऱ्या कंपनीतील स्वामित्व हक्क विभागाची जबाबदारी सांभाळणारे अधििकारी निखील पाटील यांनी समर्थ पाेलीस ठाण्यात दिली आहे. रास्ता पेठेत पादत्राणे विक्रीची दुकाने आहेत. घाऊक, तसेच किरकोळ स्वरुपात या भागात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय केला जातो. या भागातील तीन पादत्राणे विक्री करणारे दुकान पादत्राणे निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करत असल्याची माहिती पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती समर्थ पोलिसांना दिली.

पोलिसांनी तीन दुकानांवर कारवाई करुन तेथून एक लाख दहा हजार रुपयांचे पादत्राणे जप्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन माेरे यांच्या।मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.

सणासुदीच्या काळात नामवंत कपडे, पादत्राणे निर्मिती करणाऱ्या उत्पादकांच्या नावे बनावट उत्पादनांची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. नामवंत उत्पादकांच्या बनावट मालाची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. नामवंत उत्पादनांच्या बनावटे उत्पादनांची स्वस्तात विक्री केली जाते. बनावट टी शर्ट, जीन, पादत्राणे परराज्यातून पुणे, मुंबईतील बाजारपेठेत विक्रीस पाठविली जातात. यापूर्वी पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानदारांविरुद्ध कारवाई केली होती. नामवंत कंपन्यांच्या नावे तयार करण्यात आलेला लाखो रुपयांची बनावट उत्पादने पोलिसांनी जप्त केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×