जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, ८ गुन्हे उघडकीस

जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, ८ गुन्हे उघडकीस

१९ मोबाइल जप्त, बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात जबरी चोरी करणार्‍या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ८ गुन्हे उघडकीस आणून, सव्वा तीन लाखांचे १९ मोबाइल, दुचाकी जप्त केली आहे. सोहेल बादशाह खान (वय २० रा. गल्ली नंबर ८, शिवनेरी नगर, कोंढवा ) आयान झाकीर शहा (वय २१ रा. गल्ली नंबर ९, शिवनेरी नगर, कोंढवा ) फरहान वसीम शेख (वय २० रा. गल्ली नंबर ४, शिवनेरी नगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भरधाव वाहन चालकाने दुचाकीस्वार तरूणाला चिरडले – सविस्तर बातमी 

तक्रारदार विठ्ठल निलावार( वय ५३ रा. खोपोली, खालापूर) हे साधू वासवानी चौकात थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पथकाने तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलीस अमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांना संबंधित आरोपी हे कोंढवा परीसरातील असल्याची माहिती मिळाली. आरोपी हे शिवनेरीनगर भागात राहणारे असल्याचे तांत्रीक तपासावरुन स्पष्ट झाले.

बंडगार्डन तपास पथकाने कोंढव्यात धाव घेउन आरोपी सोहेल खान आणि आयान शहा, फरहान शेख यांना १७ ऑक्टोबरला अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १९ मोबाइल जप्त केले आहेत. टोळीने बंडगार्डन, वानवडी, कोंढवा, मार्वेâटयार्ड,स्वारगेट परिसरात केलेल्या गुन्ह्याची उकल केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेंद्र बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक निलकंठ जगताप, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मोहन काळे, प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, मनिष संकपाळ, शिवाजी सरंक, ज्ञानेश्वर गायकवाड, अवधुत जमदाडे, निलेश पालवे, प्रविण पाडाळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×