थेउर परिसरात दोन अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. ही घटना १८ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास थेउर गावच्या हद्दीत कोलवडीकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग भिकसिंग राजपुरोहित (वय २९, रा. थेउर, ता. हवेली) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पुण्यात बससह एसटीप्रवासात महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग हा मूळचा परराज्यातील असून, कामानिमित्त थेउर परिसरात राहायला होता. १८ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तो दुचाकीवरून कोलवडीच्या दिशेने प्रवास करीत होता. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात महेंद्रसिंग गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.
यशवंत कारखान्याजवळ जेष्ठाला उडवले
मोटार चालकाने दिलेल्या धडकेत जेष्ठ पादचारी ठार झाला आहे. हा अपघात १७ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास थेउरमधील यशवंत सहकारी साखर कारखानाजवळ डी टाईप कॉलनी रस्त्यावर घडला आहे. प्रकाश केशव श्रीमंदीलकर वय ६३ रा. डी टाईप कॉलनी, यशवंत कारखाना असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.





















