Breking News
Pune Police Action Against Criminals : पुणे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाईAkshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

लोणीकंद भागात वित्रित्र अपघातात दुचाकीस्वार ठार

Bopdev Ghat Car Accident

लोणीकंदमधील फुलगाव ते आळंदी रस्त्यावर ही घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला धडक दिली. कंटनेरच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराचा पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. लोणीकंदमधील फुलगाव ते आळंदी रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कंटनेर चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्य विक्री दुकानातून रोकड लंपास – सविस्तर बातमी

राजेंद्र चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. चव्हाणनगर, देहूगाव, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांचा भाऊ संजय (वय ५१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंटेनर चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजेंद्र चव्हाण हे १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास लोणीकंद फाटा परिसरातून आळंदी रस्त्याकडे निघाले होते. फुलगावजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर ते रस्त्यावर पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते सापडले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाातानंतर कंटेनर चालक, तसेच ट्रॅक्टर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×