कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कोंढव्यात मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि मद्याच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली.मद्य विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवदर्शनसाठी गेलेल्या जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर एअरकिंग वाईन शाॅप आहे. चोरट्यांनी १९ ऑक्टोबर राेजी मध्यरात्री मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ५७ हजारांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मद्य विक्री दुकान उघडले. तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली.
पोलिसांनी मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.



















