पुण्यात भरदिवसा कोयत्याने वार करून अल्पवयीनाला संपवले

पुण्यात भरदिवसा कोयत्याने वार करून अल्पवयीनाला संपवले

कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर वार करून केला खून

marathinews24.com

पुणे – शहरात गँगवार भडकले असून, दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आयुष कोमकर, गणेश काळे याच्या खूनानंतर मंगळवारी भरदुपारी अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर रक्ताचा पाट वाहिला. कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर वार करून त्याचा खून केला. भांडणात मध्यस्थी करणार्‍यावरही वार करून गंभीररित्या जखमी केले आहे.

पुण्यातील कायदा सुव्यवस्था गंभीर- खासदार सुळे – सविस्तर बातमी 

मयंक सोमदत्त खरारे (वय १७ रा. साने गुरुजीनगर, आंबीलओढा) असे ठार झालेल्या अल्पवयीनाचे नाव आहे. अभिजित संतोष इंगळे (वय १८,रा. दांडेकर पूल) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टोळक्याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांची पाच पथके रवाना केली आहेत. खूनाचे नेमके कारण अजून समजू शकले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक खरारे आणि त्याचा मित्र अभिजित हे मंगळवारी (दि.४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दुचाकीवरून बाजीराव रस्त्याने जात होते. पाठीमागून दुचाकीस्वार मास्क परिधान केलेल्या तिघाजणांच्या टोळक्याने वीर महाराणा प्रताप गार्डनजवळ मयंकला गाठले. त्याच्यावर कोयता, कुकरीने पाठीमागून वार करण्यास सुरूवात केली. अचानकपणे झालेल्या हल्ल्यात खरारे आणि इंगळे खाली पडले. त्यानंतरही टोळक्याने त्याच्यावर वार केले. त्याचवेळी इंगळेने मध्यस्थी केली असता, तिघाजणांनी त्याच्यावरही वार करून जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मयंकला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संतोष इंगळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मागील ३ दिवसांत पुण्यात खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगसह कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दुचाकीस्वार टोळक्याने अल्पवयीन मुलावर वार करून त्याचा खून केला असून, खुनाचे कारण समजू शकले नाही. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना केली आहेत. कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×