चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार चोरट्यांनी प्रवासी तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहायला आहे. तो परगावी गेला हाेता. गुरुवारी (१३ नोव्हेंबर) मध्यरात्री एकच्या सुमारास तो रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक सहाजवळ थांबला होता. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची तो मोबाइलवरून नोंदणी करत होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील ५० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.























