Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम घोटणे (वय २२, रा. भारती विद्यापीठ) याने फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या अल्पवयीनांचा शोध घेण्यात येत आहे.

बस प्रवासात प्रवाशाची सोन्याची चैन चोरीला – सविस्तर बातमी 

टाेळक्याने केलेल्या मारहाणीत शुभम घोटणे याच्यासह आर्यन गायकवाड, अथर्व मारणे हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आणि घोटणे हे ओळखीचे आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपी आणि घोटणे यांच्यात वाद झाले होते. गुरुवारी रात्री घोटणे, त्याचे मित्र गायकवाड, मारणे हे मोहननगर भागात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याकडे कोयते होते. त्यांनी घोटणेवर कोयत्याने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना मारहाण करून आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×