Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला

मुंढवा जमीन प्रकरण, तेजवाणी पोलिसांसमोर हजर

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवाणी यांचा पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) जबाब नोंदवला आहे. तत्पुर्वी संबंधित जमीन लिहून देणार्‍या व्यक्तींनाही पोलिसांनी चौकशीला बोलाविले होते. त्यातील काही व्यक्तीनी सोमवारी पोलिसांकडे जबाब दिला आहे. याप्रकरणात २७५ व्यक्ती असून, त्या सर्वांकडे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे.

एसटी प्रवासी महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती आहेत. ही जमीन पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीकरून शीतल तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी लिहून दिली. त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. त्यानुसार शीतल तेजवाणी यांना या जमीनीबाबत नेमके काय लिहून दिले, या व्यक्तींना काही मोबदला दिला गेला किंवा मिळाला आहे का तसेच, नेमके या व्यक्तींनी जमीनबाबत त्यांना हक्क कसा दिला, याचा तपास सुरू केला आहे. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानूसार, सोमवारी १० ते १२ व्यक्ती हजर राहिल्या. त्यांनी आम्ही जबाब नंतर देऊ, अशी भूमिका घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंढव्यातील जमीन घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी तेजवाणी यांचा जबाब नोंदवला आहे. तसेच बोपोडीतील जमीन गैरव्यवहारासंदर्भातील गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

आवश्यकता भासल्यास संबंधितांना पुन्हा बोलावले जाणार- पोलीस आयुक्त

पुणे पोलिसांनी हेमंत गवंडे, शीतल तेजवाणी, दिग्वीजय पाटील तसेच सुर्यकांत येवले यांना नोटीस बजावली आहे. जबाब देण्यास ही नोटीस बजावली होती. हेमंत गवंडे दुसर्‍याच दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन जबाब देण्यास हजर राहिले. शीतल तेजवाणी या मंगळवारी जबाब नोंदवला. त्याचे अवलोकन सुरू आहे. इतर दस्तऐवजांची पडताळणी सुरू आहे. या सर्व तपासानंतर पुढील कारवाई संदंर्भाने निर्णय घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास शीतल तेजवाणी यांना चौकशीला पुन्हा बोलविण्यात येईल. दिग्विजय पाटील यांना नोटीस दिली असून ते अद्याप हजर राहिले नसल्याचेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×