Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

एसटी प्रवासी महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावर वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात स्लॅब कोसळून दोन मजूर जखमी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वाघोली भागात राहायला आहे. त्या मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमरास नगर रस्त्यावील एसटी थांब्यावर थांबल्या होत्या. अहिल्यानगरकडे जाणार्‍या बसची त्या वाट पाहत थांबल्या होत्या. थांब्यावर गर्दी फायदा घेत चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या पिशवीनतून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ शेंडगे तपास करत आहेत.

घरकाम महिलेकडून दागिने चोरी

घरकाम करणार्‍या महिलेने ७० हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना नारायण पेठेत घडली. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला नारायण पेठेतील मोदी गणपती परिसरात राहायला आहेत. त्यांच्याकडे घरकाम करणार्‍या महिलेने ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधली. कपाटातून ७० हजार रुपयांची सोनसाखळी लांबविली. सोनसाखळी चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी सुरवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×