नवले पुलावर पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकून मोटार उलटली

नवले पुलावर अपघातांची मालिका कायम

marathinews24.com

पुणे – शहरालगत असलेल्या नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सोमवारी (दि. २४) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला मोटार धडकली. त्यामुळे संबंधित वाहन उलटल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने गाडीतील दोन्ही प्रवाशांना दुखापत झाली नसून, घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह सिंहगडरोड पोलिसांनी धाव घेत बचावकार्य राबविले, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात लागली आग – सविस्तर बातमी

नवले पुल परिसरातील मागील काही दिवसांत झालेल्या अपघातामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वाहन चालकाने नियंत्रण सुटून पुन्हा अपघात झाला. त्यामुळे मोटार उलटून चालकासह दुसरा प्रवाशी गाडीत काहीवेळ अडकले होते. मात्र, ते दोघेही सुखरूपरित्या बाहेर पडले. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील वाहतूककोंडीत भर पडली होती. माहिती मिळताच पोलिसांसह वाहतूक अमलदारांनी धाव घेत वाहतूक सुरळित केली.

बेशिस्त वाहन चालकांची चलती कायम

वारंवार होणार्‍या अपघातामुळे नवले पुल परिसरात वाहतूक विभागाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच अवजड वाहन चालकांच्या वेग मर्यादेवरही नियंत्रण आणले आहे. मात्र, तरीही अनेक दुचाकीस्वारांसह मोटार चालकांकडून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार सर्रासपणे नियमभंग करीत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अपघाताला निमत्रणही दिले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×