चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर जीवघेणा हल्ला पतीला अटक

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पतीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २२ नोव्हेंबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास बाराथे वस्ती औंधरोड परिसरात घडली आहे. केतन वसंत जगताप (वय ३५, रा. पंचशीलनगर, खडकवासला) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. अलिशा सुरेश मगर उर्फ रितीका केतन जगताप (वय २९ रा. औंधरोड, खडकी ) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दहशत माजवणार्‍या सराईताला केले स्थानबद्ध – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितीका आणि केतन हे २२ नोव्हेंबरला दुपारी पावणे तीनच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी केतनने रितीकाच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या राग व्यक्त केला. त्याने दुचाकीच्या डिक्कीतून धारदार शस्त्र बाहेर करून रितीकाच्या डोक्यात वार करून गंभीररित्या जखमी केले. हातावर, हनुवटीवर वार करून जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत आरोपी केतनला अटक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×