उरळी देवाची परिसरात २० वाहनांची तोडफोड

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

कोयताधारी टोळक्याकडून राडा, एकाला अटक

marathinews24.com

पुणे – कोयताधारी टोळक्याने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, डेक्कनमधील लुटमारीच्या घटनेनंतर फुरसुंगी परिसरातील उरळी देवाची याठिकाणी टोळक्याने २० वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याचे अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. फरहान उर्फ फर्‍या सोहेबलाल शेख वय २२ रा. आदर्शनगर, उरळीकांचन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नवाज शरिफ शेख (वय ३६, रा. काळेपडळ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर जीवघेणा हल्ला पतीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळी देवाची परिसरात स्थानिकांनी रात्रीच्या सुमारास वाहने उभी केली होती. त्यावेळी शस्त्रधारी फरहान शेख आणि त्याच्या साथीदारांनी २३ नोव्हेंबरला वाहनांची तोडफोड करण्यास सुरवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २० वाहनांच्या काचा फोडून टोळके पसार झाले. घडलेल्या घटनेची माहिती स्थानिकाने फुरसुंगी पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत शेखला अटक केली. त्याच्या इतर अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×