Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या पुजार्‍यांची उपस्थितीत पार पडला उद्यापन व महाहोम-हवन’ सोहळा

१६ सोमवार उद्यापन व होम-हवन’ सोहळा भक्तिमय जल्लोषात

marathinews24.com

पुणे – ‘१६ सोमवारचे उद्यापन तथा होम-हवन’ या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि पवित्र वातावरण निर्माण केले. गणेश फिरंगे मित्र परिवाराच्या वतीने वाघोली येथे आयोजित करण्यात आला होता. भगवान महादेवाच्या जयघोषाने येथील परिसर दुमदुमून निघाला होता, वेदघोष आणि मंत्रपठणाने येथील हवेमध्ये देखील नवचैतन्य निर्माण झाले होते तसेच पारंपरिक पद्धतीने पार पडलेली पूजा-अर्चा यांमुळे कार्यक्रमाला विशेष अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले होते.

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी – सविस्तर बातमी

कार्यक्रमासाठी भारतातील १२ ज्योतिर्लिंग तसेच शक्तीपीठांचे प्रमुख पुजारी उपस्थित राहिले यामध्ये श्री सोमनाथचे पंडित विशाल कृष्ण प्रसाद जानी, मल्लिकार्जुनचे पंडित मतापती चैतन्यकुमार व मत्तम राजेश्वर, उज्जैन महाकाळेश्वरचे श्री बंटी शर्मा (पीआरओ), परळी वैद्यनाथचे पंडित राघव दिगंबर जोशी, भीमाशंकरचे पंडित मयूर रत्नाकर कोडिलकर व जालिंदर काका कौदरे, नागेश्वरचे पंडित द्यनशन नागनाथ पाठक, त्र्यंबकेश्वरचे पंडित कृपेश योगेंद्र भट्ट, केदारनाथचे पंडित प्रवीणचंद्र तिवारी तसेच विंध्याचल धामचे पंडित गणेश चंद्र पांडे आणि मुंबादेवीचे पंडित अभिषेक तिवारी आदी मान्यवरांचा समावेश होता. काही पुजार्‍यांच्या पत्नींचीही विशेष उपस्थिती लाभली होती.

होम-हवनादरम्यान सर्व भक्तांनी सामूहिक प्रार्थना करून सुख-समृद्धी, आरोग्य-कल्याण आणि समाजाच्या शांततेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. महिला मंडळ, गावातील मान्यवर, तसेच गणेश फिरंगे मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भक्तांनी प्रसादाचा लाभ घेत या अध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा, धार्मिक प्रसन्नता, अध्यात्मिक ऊर्जा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×