लिफ्टमध्ये मुलीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत

लिफ्टमध्ये मुलीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत

बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या लिफ्टमधून घरी निघालेल्या एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला वारजे पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी महेश त्र्यंबाकराव चिरलीकर (वय ५३, मूळ रा. देगलूर, नांदेड) याला अटक करण्यात आली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर रोजी तक्रारदार महिलेची मुलगी कराटे प्रशिक्षण वर्गाला गेली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास ती सोसायटीतील लिफ्टमधून निघाली होती. त्यावेळी आरोपी चिरलीकर लिफ्टमध्ये होता. त्याने लिफ्टमध्ये मुलीशी अश्लील कृत्य केले, असे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी श्रीकांत बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर, मूळ रा. आडगाव, जि. नाशिक) याला अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी शिंदे याची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती.

आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढले. त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबात विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत. दरम्यान, विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×