Breking News
Bopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा

जिल्ह्यातील सुक्ष्म व लघू उद्योजकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा पुरस्कार २०२५

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या जिल्हा पुरस्काराकरिता पात्र उद्योजकांकडून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी केले आहे.

ग्रामपंचायत सेवकावरील हल्ल्याचा पॅन्थरकडून निषेध; दिपक केदार यांनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट – सविस्तर बातमी

पुरस्काराचे स्वरुप प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रोख रक्कम व मानचिन्ह, तर द्वितीय क्रमांकास रुपये १० हजार रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उद्योग घटकाची उद्यम नोंदणी दिनांक ०१ जानेवारी २०२२ पूर्वीची (किमान तीन वर्षांपूर्वीची) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित सुक्ष्म, लघू उद्योगाने मागील सलग दोन वर्षे उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवलेली असावी. संबंधित उद्योग कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथे विनामूल्य उपलब्ध असून अर्जासंबंधी व पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 020-25537966 यांच्याशी संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×