Breking News
Illegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून २ लाखांच्या बांगड्या चोरीला

Pune Crime News

अलंकार पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून दोन लाख रुपयांच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार एरंडवणे भागात उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेपाळी रखवालदाराच्या घरातून ३ लाखांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला एरंडवणे भागातील अर्चनानगर सोसायटीत राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेने शयनगृहातील टेबलावर दोन लाख रुपयांच्या साेन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या. चोरट्यांनी दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीत कामानिमित्त येणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करत आहेत.

धनकवडीत सदनिकेतून दागिने लांबविले

धनकवडी भागातील सोसायटीत असलेल्या सदनिकेतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीतील चैतन्यनगर सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सदनिकेतून दोन लाख एक हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×