Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात मद्यपी वाहन चालक, हुल्लडबाजांवर कडक कारवाईचे आदेश

निवडणूक, अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे आदेश

marathinews24.com

पुणे – शहरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता – सविस्तर बातमी

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करुन भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई, तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शुक्रवारी (२६ डिसेंबर) पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आगामी महापालिका निवडणूक, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोळा, तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने वाहन चालकांविरुद्ध करण्यात येणारी कारवाई तीव्र करण्यात यावी. चौका-चौकात नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मद्यपी, हुल्लडबाजी करणारे रडारवर

लष्कर, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी परिसरात गर्दी होती. या भागात पबची संख्या मोठी आहे. या भागातील पब, रेस्टाॅरंटच्या परिसरातील गैरप्रकार होणार नाहीत, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पब, रेस्टाॅरंट, हाॅटेलच्या परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियम धुडकावणे, मद्यप्राशन करुन भरधाव वाहने चालविणे, तसेच हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×