पिस्तूलाच्या धाकाने दहशतीचा प्रयत्न, टोळक्याचा प्रयत्न

खुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

नर्‍हे पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पिस्तूलाचा वापर करीत परिसरात दहशत निर्माण करणार्‍या टोळक्याला नर्‍हे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ जानेवारीला पहाटे पावणेपाचच्या सुमारास धायरीतील गोकुळनगरात घडली आहे. यश विनय शहा (वय २५ रा. नर्‍हे) यश विठ्ठल कट्टीमनी (वय २४, रा. गोकुळनगर, धायरी ) आणि यश मनोहर पोळ (वय २४ रा. नर्‍हे रोड गोकुळनगर, धायरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार शोभासिंग भालेराव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

येरवड्यात राडा घालणार्‍या शस्त्रधारींना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भालेराव हे कॉप्स २४ मध्ये कार्यरत असून, ११ नोव्हेंबरला गोकुळनगरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आरोपी हे पिस्तूलाचा धाक दाखवून दहशतीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार नर्‍हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूलासह इतर शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×