परवानगीशिवाय मिरवणूक काढली; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

जनता वसाहत परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – पोलीस परवानगी न घेता मिरवणूक काढल्यानंतर जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवनिर्वाचित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोथरूडमध्ये मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (१७ जानेवारी) जाहीर करण्यात आला. जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास जनता वसाहत परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. विजयानंतर शहरात मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली होती. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार आदक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×