Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

- श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन

भाविकांनी व्यक्त केले समाधान

marathinews24.com

नांदेड – श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन – सविस्तर बातमी 

विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते.

या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला.

याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आबालवृद्धांसह दूरवरून आलेल्या भाविकांनी या सेवा उपक्रमांचा लाभ घेतला.

सेवा स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निःशुल्क सेवांबाबत बहुसंख्य भाविकांनी समाधान व्यक्त केले. सर्व स्टॉलधारकांनी दोन्ही दिवस योग्य नियोजन करून उत्कृष्ट सेवा बजावली असून ही सेवा निश्चितच प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

या सेवा उपक्रमांमुळे नांदेडकरांचा सेवाभाव भाविकांच्या मनात कायम राहील. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल व्यवस्थापन पथकाने स्टॉल नियोजन, वितरण व संचालनासाठी विशेष परिश्रम घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×