Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर

marathinews24.com

पुणे – ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (२६ जानेवारी २०२६) राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलाची मान उंचावली आहे. पुणे जिल्ह्यातील तांबाड, गुंजन मावळ ( ता. भोर) येथील शेतकरी कुटुंबातून पोलिस सेवेत दाखल झालेल्या शिळीमकर यांचे एमबीए (पीपीएम) पर्यंतचे उच्च शिक्षण झाले आहे.

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन – सविस्तर बातमी 

पोलिस सेवेत ३२ वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या अविनाश शिळीमकर यांनी मुंबई, सातारा, नागपूर, अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, आंतरराज्यीय टोळ्या, संघटित गुन्हेगारी तसेच ईव्हीएम चोरीसारख्या संवेदनशील प्रकरणांचा छडा लावत त्यांनी कौशल्यपूर्ण तपासाची छाप उमटवली. पुणे ग्रामीण आणि शेजारील जिल्ह्यांतील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करत अनेक आरोपींना अटक करण्यात आली, तर कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोरोना काळातही त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक भान जपत कार्य केले. स्थलांतरित मजुरांसाठी मदत, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा पुढाकार उल्लेखनीय ठरला. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखताना संयम, समतोल आणि संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्या.

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रभावी कामगिरीमुळे यापूर्वी त्यांना २०२४ मध्ये पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून पुणे ग्रामीण पोलिस दलाचा गौरव वाढला आहे. आज पर्यंतची सेवा प्रशंसनीय व उल्लेखनीय असल्याने वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच नागरिकांमध्ये त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×