Breking News
Jyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

Pune Cyber Fraud Cases

सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पाेलिसांकडून कारवाईची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज फेडण्यासाठी सोनारच कारागिर बनला दरोडेखोर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मुंढवा भागात राहायला आहे. सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची बतावणी सायबर चोरट्याने त्यांच्याकडे केली. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती सायबर चोरट्याने दाखविली. ज्येष्ठ नागरिकाला तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या खात्यात साडेतीन लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×