Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कर्ज फेडण्यासाठी सोनारच कारागिर बनला दरोडेखोर

माजलगावच्या त्या प्लॅनचा एलसीबीने केला पर्दाफाश

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी सोनाराच्या दुकानात काम करणारा कारागिरच दरोडेखोर बनल्याचे आता समोर आले आहे. माजलगाव येथील सोनाराला लुटणाऱ्या एका कारागिराच्या प्लॅनचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुर्णपणे पर्दाफाश केला आहे. ६० लाखांच्या दरोड्याचा रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह माजलगावच्या ज्वेलर्स दुकानात कारागिर म्हणून काम करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १८ तोळे सोन्याचे दागिणे आणि एक किलो चांदी जप्त केली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या नेतृत्वात अवघ्या पाचच दिवसात एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याची उखल केली आहे. त्यामुळेच एलसीबीच्या या कारवाईचे सर्वस्तरावरून कौतूक केले जात आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात महिलांसह तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

माजलगाव येथील सोनार दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके (वय ३१ वर्षे, रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे २५ जानेवारीला त्यांच्या माजलगाव येथील अमोल सोन्याचे दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी पुतण्यासह जात होते, यावेळी पाठीमागून मोटार सायकलवर येऊन त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले. गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना स्प्लेंडरवरील तीन इसमांनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्या चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळून गेले. त्यावरून पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण गु.र.नं. ३०/२०२६ कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला.

हा गुन्हा घडल्यापासून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक आदेश दिले, सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे, असे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले होते, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. तपासात तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर असे निष्पन्न झाले की, यातील फिर्यादी गायके यांचा मोटार सायकल ज्यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर व बजाज पल्सरने माजलगाव शहरातून रेकी करून पाठलाग केला असून त्यांनी आपसात मोटार सायकलवर बसलेल्यांची अदला बदली करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने यामध्ये बारकाईने तपास करून यातील आरोपीं निष्पन्न केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, यातील आरोपी हे सध्या बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आहेत.

त्यावरून पथकांनी सदर ठिकाणी जाऊन एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले (वय ३५ वर्षे, रा. पाटोदा ता. परतूर जि.जालना ह.मु. पांडुरंग रेसीडेन्सी समोर, कॅनाल रोड, बीड), कृष्णा तुकाराम निरडे (वय २२ वर्षे, रा. पावर हाऊस रोड, माजलगाव जि. बीड), अभिषेक अशोक शिंदे (वय २२ वर्षे रा. पावर हाऊस रोड, माजलगाव जि. बीड) यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अधिक विचारपूस करता एकनाथ कपाले यांनी सांगितले की, तो सोनार कारागिर असून त्याने पूर्वी माजलगाव येथे वेगवेगळे ठिकाणी कारागिरीचे काम केले होते व त्याला माजलगाव येथील सोनार दुकानदारांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती. तसेच तो सध्या खूप कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सोनार दुकानदारास आठवडी बाजारास जाताना लुटण्याचे ठरिवले. त्यानुसार एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे आणि अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला. त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे (वय २८ वर्षे, रा. उमरगा मन्ना ता.उदगीर जि. लातूर ह.मु. पुणे) आणि विशाल सूर्यकांत सुळ (रा. माजलगाव ह.मु. पुणे) यांना सदर कटात सामील केले.

आरोपींच्या प्लॅननुसार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी हिरो होंडा स्प्लेंडरवर एकनाथ कपाले व संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यांनी फिर्यादीची रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांचा सदर पाच आरोपीतांनी हिरो होंडा स्प्लेंडर व बजाज पल्सरवर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे. सदर आरोपीतांचे ताब्यातून १८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदी असा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे (वय २८ वर्षे, रा. उमरगा मन्ना ता. उदगीर जि. लातूर) यास देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गोविंद पांडव माजलगाव ग्रामीण हे करीत आहेत. ही धडाकेबाज कामगिरी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुशांत सुतळे, महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, मारुती कांबळे, भागवत शेलार, राहुल शिंदे, दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, मनोज परझने, अशफाक सय्यद, अर्जुन यादव, चालक पोह गणेश मराडे, नितीन वडमारे, अतुल हराळे (सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड) आणि टीएसी सेलचे पोलीस उप निरीक्षक शेखर औटे, विकी सुरवसे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×