Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीकरिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; अधिकाधिक मतदारांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

रत्नागिरीत सीआयएसएफकडून ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन – सविस्तर बातमी 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’ वरुन डाऊनलोड करता येईल. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही शोधता येणार आहे.

याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×