पेट्रोल पंपावरील बाऊन्सरच निघाला चोर, आरोपीला अटक

साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंप कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून भरदिवसा तब्बल ६ लाख ७० हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश दिनकर मलकीकर ( वय ३०, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६ लाख ६० हजारांची रोकड जप्त केली आहे. ही घटना २६ ते २७ जानेवारीला भरदुपारी टिंगरेनगर याठिकाणी घडली होती. याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पूना क्लबच्या संचालकांना धमकावले; भाजप प्रवक्त्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह टिंगरेनगर येथे राहण्यास असुन, केकान पेट्रोल पंपाची मालकीण आहे. त्यांच्या पेट्रोल पंपावर सुरक्षेसाठी बाऊन्सर कामाला ठेवला होता. त्याने २६ ते २७ जानेवारी कालावधीत पेट्रोल पंप कार्यालयाची बनावट चावीने लॉकर उघडूनन चोरी केली होती. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी तपास करीत पुरावा नसताना आरोपीचा माग काढला. त्याला अटक करून साडे सहा लाखाचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सी. रजनीकांत, एसीपी जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक महेश भोसले, अमलदार यशवंत किर्वे, स्वप्निल कांबळे, संपत भोसले, संजय बादरे, विशाल गाडे, वामनमामा सावंत, कष्णा माचरे, धवल लोणकर, होना साबळे, चपटे, पानसरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×