Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पूना क्लबच्या संचालकांना धमकावले; भाजप प्रवक्त्याविरुद्ध गुन्हा

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव आणण्यासाठी लष्कर भागातील पूना क्लबच्या संचालकांना धमकाविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, तसेच शहरातील पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी अली दारुवाला यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोक्का गुन्ह्यात पसार टोळीप्रमुखाला बेड्या – सविस्तर बातमी

याबाबत ४७ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या लष्कर भागातील प्रतिष्ठित पूना क्लबच्या संचालक आहेत. त्या शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० जानेवारीला क्लबमधील जलतरण तलावाजवळील पार्किंगमधून मोटार घेऊन घरी निघाल्या हाेत्या. त्यावेळी दारूवाला हे दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी महिलेच्या मोटारीजवळ मोटार लावली. गोल्व्हा नावाच्या एका व्यक्तीबरोबर झालेला पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सुरुवातीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ तपास करत आहेत.

‘तक्रारदार महिलेशी माझा कोणताही वाद नाही. मी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पदाधिकारी आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना व्यवहार पूर्ण करा, असे सांगत होतो. त्या व्यवहारात मी मध्यस्थ होतो. त्यामुळे त्यांना सांगायला गेलो होतो. आमच्यातील वाद मिटला आहे’, असे दारुवाला यांनी स्पष्ट करुन महिलेने केलेल आरोप फेटाळून लावले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×