पुण्यातील गुंडगिरीचा बिमोड करा – पोलीस महासंचालक सदानंद दाते

पुणे, पिंपरी, ग्रामीण पोलिसांच्या बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

marathinews24.com

पुणे – राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातील गुंडगिरीचा बिमोड करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. शहर, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी घटनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पार्श्वभूमीवर पाषाण येथील बिनतारी संदेश विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयककुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

अजितदादांच्या विमानात बॉम्बचा स्फोट झाला की इंजनचा – खासदार बजरंग सोनवणे – सविस्तर बातमी

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या विस्तार वाढत आहे. जिल्ह्यात ओैद्योगिक वसाहती आहेत. मोठ्या संख्येने परगाव, तसेच परराज्यातून नागरिक शहर, जिल्ह्यात रोजगारासाठी स्थायिक होत आहेत. शहर, जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आदेश पोलीस महासंचालक दाते यांनी बैठकीत दिले. अमली पदार्थ तस्करी, छुप्या पद्धतीने विक्रीवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. शहर आणि जिल्ह्यातील गुंड टोळ्या, सराईतांविरुद्ध केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती या वेळी अमितेश कुमार,विनयकुमार चौबे, संदीपसिंग गिल यांनी दिली. जिल्हा परिषदेची निवडणूक शनिवारी (७ फेब्रुवारी) होणार आहे. त्याअनुंषगाने तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा दाते यांनी घेतला. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×