Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कात्रजमध्ये ओैषध दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरी

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ओैषध विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना कात्रज भागात घडली.या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ओैषध विक्री दुकानाच्या मालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे कात्रजमधील माेरेबाग परिसरात ओैषघ विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ३३ हजार ५०० रुपये चोरून नेले. रविवारी सकाळी दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस हवालदार महांगरे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी कात्रजमधील आंबेगाव भागात असलेल्या एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अलपवयीनांना ताब्यात घेतले. वानवडी, येरवडा, ओैंध, बाणेर, माॅडेल काॅलनी परिसरातील दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरुन नेण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंढव्यात किराणा माल दुकानातून रोकड चोरी

मुंढव्यात किराणा माल दुकानातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका किराण माल दुकानदाराने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार किराण माल विक्रेत्याचे मुंढव्यातील भीमनगर भागात दुकान आहे. किराणा माल दुकानदार दुकान बंद करुन स्वच्छतागृहात गेला होता. दुकानाची चावी त्याने दुकानाच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या जागेत ठेवली होती. चाेरट्याने अडगळीत ठेवलेली चावी घेऊन दुकानाचे कुलूप उघडले. गल्ल्यातील ७० हजारांची रोकड चोरुन चोरटा पसार झाला. रोकड चोरणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस हवालदार धांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×