Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कौटुंबिक वादातून सलून व्यावसायिकाने केली आत्महत्या

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादासह पत्नीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून सलून व्यावसायिक पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवणे येथील दांगट इस्टेटमधील शोभा हाईटस सोसायटीत २ फेब्रुवारीला घडली आहे.

पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; २५ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. शोभा हाईटस सोसायटी), दांगट इस्टेट, शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे शोभा हाईटस येथे सलुन आहे. १३ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, पती- पत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या. नंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घरी आणले होते. मात्र, त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी २ फेब्रुवारीला चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महेश क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आणि धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करीत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×