Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

महिला आरोग्य विषयक जनजागृती फॅशन शो संपन्न

महिला आरोग्य विषयक जनजागृती फॅशन शो संपन्न

विजेत्यांना अल्बम सॉन्ग मध्ये काम करण्याची संधी मिळणार

marathinews24.com

पिंपरी – अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. तीन वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने स्वप्नील गोगावले एन्टरटेनमेंट आणि आई फाऊंडेशन यांच्या वतीने एलप्रो मॉल,चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा – सविस्तर बातमी 

मिस / मिसेस / मिस्टर आणि किड्स अशा विभागात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी डॉ. महेश थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अर्चना माळी, स्वप्नील गोगावले,डॉ.अजितसिंह पाटील ,राज रणदिवे,अर्चना माघाडे,निलाक्षी जाधव,केतकी शिरबावीकर,स्मिता मधुकर,डॉ.स्मिता बारवकर आई फाउंडेशनच्या सई वढावकर, कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कशिश प्रॉडक्शन्स चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर ओम जगदाळे ने देखिल रॅम्प वॉक केला.

फॅशन शो विषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम केले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत काश्मिर खोऱ्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले आहे. या शो मधूनही तीच जागृती आम्ही करत आहोत.

स्वप्नील गोगावले म्हणाले,  मी अनेक फॅशन शो बघितले, उपस्थित राहिलो आहे, मात्र हा मिस / मिसेस / मिस्टर आणि किड्स फॅशन शो एक अनोखा अनुभव माझ्यासाठी होता, कारण पुण्याचे पॅडमॅन अशी ओळख निर्माण केलेल्या योगेश पवार यांच्या संकल्पनेतून हा शो महिलांच्या आरोग्य विषयक जनजागृती आणि सुरक्षा या विषया भोवती गुंफन्यात आला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना आम्ही आमच्या आगामी अल्बम सॉन्ग मध्ये संधी देणार आहोत.

स्पर्धकांचा मेकअप वेलनेस वर्ल्ड ब्युटी स्कूल यांच्या वतीने करण्यात आला होता. या स्पर्धेचे परीक्षण सपना भावे, प्रियंका मिसाळ, अभिनेत्री पूजा वाघ, प्रीती कोचर, प्रिया पाटील आणि माधवी बोकील यांनी केले. तर सूत्रसंचालन आरजे बंड्या यांनी केले.

विजेत्यांची नावे

क्रितिका सिंह, पूनम मौर्य, आशिमा खन्ना, अक्षय मालुंजकर, आयांश गणपते, मिशिता शेट्टी, सानवी फाळके

उपविजेत्यांची नावे

डिंपल डोगरा, जस्वीन सिंघ, उत्कर्ष गोरे, बलजीत, सार्थकी केदारी, सिया पाटील, हिमाली सावे, वैष्णवी कापले, विराज मिसुरकर, प्रेम शहा, प्रिया दिलोड, कविता पवार, स्नेहा पोतदार, टीना नेगी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×