Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

वाघोली-लोहगाव रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना वाघोली-लोहगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हाॅटेल आरक्षणाच्या नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगाव भागात राहायला आहे. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास महिला लोहगाव-वाघोली रस्त्यावरुन निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाएरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना बाजीराव रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत.. त्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील बसने प्रवास करत होत्या. बाजीराव रस्त्यावर चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. पोलीस कर्मचारी भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×