Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न; १३८० उमेदवारांना प्रशिक्षणास प्रशासकीय मान्यता

अल्पकालीन प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमांचे कार्यवाटप करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी माहिती दिली की, एकूण १३८० उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी ९ प्रशिक्षण संस्थांकडून ११७० उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उर्वरित २१० उमेदवारांसाठी इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली तंत्रज्ञ, फळे व भाजीपाला संरक्षण तंत्रज्ञ तसेच सहाय्यक इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांच्या एकूण ७ बॅचेससाठी अद्याप प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत. संबंधित अभ्यासक्रमांसाठी पात्र प्रशिक्षण संस्थांनी व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्तापेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

मराठी भाषा गौरव दिन विशेष लेख – सविस्तर बातमी

अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांचा वापर करून रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमध्ये प्रशिक्षण संस्था व उमेदवारांसाठी अल्पकालीन रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम तसेच किमान कौशल्य विकास कार्यक्रम या दोन्ही योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेमार्फत उमेदवारांना विविध प्रशिक्षण संधी, उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराचे पर्याय तसेच कौशल्य विकासाशी संबंधित विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांनी कार्यशाळेचे नियोजन करून संबंधित प्रशिक्षण संस्था व उमेदवारांची उपस्थिती सुनिश्चित करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×