Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पुणे ग्रँड टूरकडून सायकलिंग समुदायासाठी अधिकृत नोंदणीचे आवाहन

पुणे ग्रँड टूरकडून सायकलिंग समुदायासाठी अधिकृत नोंदणीचे आवाहन

सायकलिंग क्षेत्रासाठी एकात्मिक आणि भविष्याभिमुख जाळे निर्माण करण्याचा उद्देश

marathinews24.com

पुणे – पुणे ग्रँड टूरच्या अभूतपूर्व यशानंतर, जिल्हा प्रशासन आणि स्पर्धा आयोजकांनी पुण्यातील सायकलिंग इकोसिस्टम अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर, व्यावसायिक सायकलपटू, सायकलिंग क्लब, संस्था आणि या क्षेत्राच्या वाढीस हातभार लावणाऱ्या सर्व घटकांसाठी पुणे ग्रँड टूरने अधिकृत नोंदणी उपक्रम सुरू केला आहे.

शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत १५ वाहनांवर कारवाई – सविस्तर बातमी 

या उपक्रमासाठी www.punegrandtour.in या अधिकृत संकेतस्थळावर मोफत नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यातील सायकलिंग क्षेत्रासाठी एकात्मिक आणि भविष्याभिमुख जाळे निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. भारतातील सायकलिंग क्रांतीचे अग्रदूत म्हणून, सायकलिंग क्षेत्रातील सर्व घटकांना एका समान व्यासपीठावर आणणे, प्रतिभा संवर्धन, ज्ञानविनिमय आणि या क्रीडा प्रकाराची संरचित वाढ साध्य करणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

सायकलिंग क्षेत्राशी संबंधित सर्व पात्र व्यक्ती व संस्थांनी संकेतस्थळावरील लिंकद्वारे नोंदणी करून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नोंदणीसाठी पात्र श्रेणी पुढीलप्रमाणे :

१. वैयक्तिक सायकलपटू
व्यावसायिक, हौशी स्पर्धक, रँडोनर, मनोरंजन व फिटनेस सायकलिस्ट, कम्युटर, उत्साही सायकलपटू, प्रशिक्षक, कोच व राईड लीडर्स.

२. सायकलिंग क्लब / गट / संस्था
समुदाय, अधिकृत क्लब, असोसिएशन, फेडरेशन, अकादमी, शाळा व महाविद्यालयीन संघ, कॉर्पोरेट संघ, टूरिंग कलेक्टिव्ह व डिजिटल प्लॅटफॉर्म.

३. स्पर्धा / इव्हेंट आयोजक
रोड रेस, एमटीबी स्पर्धा, ग्रॅन फोंडो, ब्रेव्हेट–ऑडॅक्स, सायक्लोथॉन, स्टेज रेस, लीग, चॅम्पियनशिप, राईड ड्राईव्ह, टूर व मोहिमा.

४. सायकलिंग उद्योग / व्यवसाय
सायकल ब्रँड्स, घटक उत्पादक, ॲपरेल व गिअर कंपन्या, रिटेल स्टोअर्स, वितरक, रिसेलर्स, वर्कशॉप व सर्व्हिस सेंटर्स, बाईक फिट स्टुडिओ, परफॉर्मन्स लॅब, रेंटल व बाईक शेअरिंग सेवा तसेच मोबिलिटी सोल्युशन्स.

५. मीडिया / कंटेंट क्रिएटर्स / प्लॅटफॉर्म
यूट्यूब चॅनेल, पॉडकास्ट, ब्लॉग, व्ह्लॉग, फोटोग्राफर, फिल्ममेकर, पत्रकार, प्रिंट व डिजिटल प्रकाशने, कम्युनिटी पेजेस, ट्रेनिंग ॲप्स, रूट / नेव्हिगेशन ॲप्स व इव्हेंट लिस्टिंग प्लॅटफॉर्म.

पुण्यातील सायकलिंग क्षेत्र अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

चला, पुण्यातील सायकलिंगचे भविष्य घडवण्यासाठी एकत्र येऊया.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×