Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

अजित दादांचा मृत्यू तपास सीबीआयकडे वर्ग होणार; शासनामार्फत पत्रव्यवहार सुरू – सुनील रामानंद

अजित दादांचा मृत्यू तपास सीबीआयकडे वर्ग होणार शासनामार्फत पत्रव्यवहार सुरू - सुनील रामानंद

बारामती विमान अपघातप्रकरण

marathinews24.com

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, याप्रकरणी दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून योग्य पध्दतीने सुरू आहे. हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे वर्ग करावा, यासंदर्भात पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंतचा आमच्याकडून तपास तीन मुद्यांवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत-ना.विखे पाटील – सविस्तर बातमी 

रामानंद म्हणाले, ‘अपघातामध्ये कोणता घातपात आहे का, गुन्हेगारी कृत्य घडले आहे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स आहे का? या दृष्टीने सीआयडीमार्फत तपास केला जात आहे. घटनेचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. बारामती वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅब, एविएशन ऑथॉरिटी आणि केंद्रातील तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (एएआयबी) आणि सीआयडी यांच्यामध्ये समन्वय ठेवून तपासाला गती दिली आहे. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे सीआयडी पुढील तपास करणार आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्याकडे सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. सीआयडीने या प्रकरणात बरेच पुरावे एकत्रित केले आहेत. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे रामानंद यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून बारामतीच्या दिशेने विमान प्रवास करत असताना लॅडींगवेळी विमानाचा अपघात झाला. अपघातात एकूण पाचजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्याच दिवशी सरकारने याचा तपास सीआयडीकडे वर्ग केला.

अन्य प्रश्नांवर उत्तर देणे टाळले

विमान अपघाताच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे का, ब्लॅक बॉक्स जळाला आहे का? यासह अन्य प्रश्नावर अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी उत्तर देणे टाळले. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, सीआयडी पुणे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, सीआयडी मुंबई कोकण विभागाचे पोलिस अधीक्षक प्रशांत वागुंडे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×