Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डिस्काऊंटमधील शेअर्सचा नाद पडला दिड कोटींना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डिस्काऊंटमध्ये मिळणाऱ्या शेअर्सचा नाद खराडी येथील एका जेष्ठाला चांगलाच महागात पडला आहे. शेअर्स तर मिळाचे नाही मात्र, त्या नादात या जेष्ठांना तब्बल 1 कोटी 49 लाख 33 हजार रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी 75 वर्षीय जेष्ठाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रींगचा धाक, पोलिसाची बतावणीने 26 लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींसोबत संपर्क साधून त्यांना आपल्या व्हॉटस्‌ अपग्रुमध्ये ॲड करून घेतले. त्यानंतर त्यांना डिस्काऊंटमध्ये (कमी किंमतीत) शेअर्स मिळतील तसेच आयपीओ देखील अलोटमेंट होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल असे प्रलोभन दाखविले. त्यालाच फिर्यादी बळी पडले. त्यांना जाळ्यात खेचण्यासाठी सायबर चोरट्यांनी एका ॲपवर शेअर्स, आयपीओमध्ये होणारा नफा दाखवून विश्र्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींनी वेळोवेळी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर 1 कोटी 49 लाख रुपये हवाली केले. दरम्यान, काही दिवसानंतर फिर्यादींना आपण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.

अशाच प्रकारे सिंहगडरोड येथील व्यक्तीची देखील शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 26 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, 52 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगडरोड पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नांदेडसिटी परिसरातील 42 व्यक्तींना सुद्धा सायबर ठगांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 8 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, 42 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीन नांदेडसिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×