Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मनी लॉन्ड्रींगचा धाक, पोलिसाची बतावणीने 26 लाखांचा गंडा

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर ठगांच्या विरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कुलाबा क्राईमब्रँच मुंबई पोलिस असल्याची बतावणी करत मनी लॉन्ड्रींगच्या धाकाने सायबर चोरट्यांनी धानोरी येथील एका व्यक्तीची 26 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी 66 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर ठगांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 ते 13 फेब्रवारी 2026 दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.

रेल्वेतील नोकरीच्या आमिषाने ८ जणांच्या फसवणूकीचा प्रयत्न – सविस्तर बातमी

सायबर ठगांनी फिर्यादींना फोन करून ते पोलिस अधिकारी असून, कुलाबा क्राईमब्रँच मुंबई पोलिस बोलत असल्याची बतावणी केली. फिर्यादींवर मनी लॉन्ड्रींगची केस असून, बेकायदेशीर जाहिरात करणे तसेच लोकांना दमदाटी करून त्रास देणे, फसवणूक करणे अशा तब्बल 20 तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत असे सांगून धमकावले. तसेच तुमच्या बँक खात्यातून मनीलॉन्ड्रींग झाली असून, याबाबत आमच्याकडे केस दाखल असल्याचे सांगितले. फिर्यादींना देखील खरे वाटले. फिर्यादी घाबरले त्याच संधीचा फायदा घेत सायबर ठगांनी त्यांना अटक करण्याची भिती दाखवून वेळोवेळी आपल्या खात्यावर 26 लाख 10 हजार रुपये भरून घेतले. फिर्यादीना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. हांडेवाडी येथील 63 वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी शेअर्स मार्केटमधील गुंतवणूकीच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×