Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन

पीएमपीएलच्या नावाने बनावट अ‍ॅप्लीकेशन

खोटा पास तयार करून फिरणार्‍याविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसचे बनावट अ‍ॅप्लीकेशन बनवून त्याद्वारे खोटा पास करीत फुकट प्रवास करणार्‍याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ फेबु्रवारीला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहायक डेपो व्यवस्थापकाने फिर्याद दाखल केली आहे.

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी जाळ्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सहायक डेपो व्यवस्थापक असून, ते २६ फेबु्रवारीला भारती विद्यापीठ परिसरातील बीआरटी मार्गात प्रवाशांकडील तिकीट तपासात होते. त्यावेळी एका प्रवाशाने मोबाइलमध्ये पीएमपीएल बस प्रशासनाने बनवलेल्या अ‍ॅप्लीकेशनप्रमाणेच अ‍ॅप तक्रारदाराला दाखवले. मात्र, संशय आल्यानंतर संबंधित अ‍ॅपची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आरोपीने बनावट अ‍ॅपचा वापर करीत खोटा पासद्वारे शहरातील विविध भागातून मोफत बसप्रवास करीत पीएमपीएल प्रशासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×