Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी जाळ्यात

वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून त्याला पकडले आहे. दरम्यान, गँगस्टर निलेश घायवळ देखील परदेशात पळाला असून, अद्याप पोलिसाना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छ. संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यात ३ महिन्यातच नवविवाहितेने केली आत्महत्या – सविस्तर बातमी

फरार असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद केले जात आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिस त्यांच्याकडे असलेल्या मोक्कातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना उपनिरीक्षक संजय नरळे यांना अमोल लाखे याच्याबाबत माहिती मिळाली. तो बार्शी शहरात राहत असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्यातील कबुली दिली आहे. त्याला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे तसेच उपनिरक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार अमोल सुतकर यांच्यासह पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×