Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक

कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची चार लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

स्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चंदननगर भागात राहायला आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘एका खासगी वित्तीय संस्थेकडून ऑनलाइन पद्धतीने कर्ज घेतले असून, हप्ते थकले आहेत. हप्ते न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे’, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी चार लाख ८१ रुपये घेतले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले होते. त्यानंतर चोरट्यांकडून तरुणाला धमकाविण्यात येत होते. चोरट्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे कात्रज भागातील आंबेगाव परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाव संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी १७ लाख रुपये घेतले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×