Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार आजोबा, नातीचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भोर तालुक्यातील दुर्घटना

marathinews24.com

पुणे – गावी निघालेल्या दुचाकीस्वार आजोबा आणि नऊ वर्षीय नातीचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भोर तालुक्यात घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९), तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, दोघे रा. तांभाड, ता. भोर, जि. पुणे ) अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. डंपर चालक आकाश शिवाजी भूषणे (रा. मांजरी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी सुधाकर शिळीमकर यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रेमसंबधाला विरोध करुन तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिळीमकर आणि कुटुंबीय हे सध्या कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहायला आहेत. शिळीमकर कुटुंबीय मूळचे भोर तालुक्यातील तांभाड गावचे रहिवासी आहेत. शनिवारी (१४ मार्च) दुचाकीस्वार शिवाजी शिळीमकर हे नात तन्वी हिला घेऊन गावी निघाले होते. तांभाड-नसरापूर मार्गावरील देऊळवाडी हातवे परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातात दुचाकीस्वार आजोबा आणि नऊ वर्षीय नातीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तांभाड गावात शोककळा पसरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×