Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल;पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल;पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहिता वैष्णवी यशवंत लाटे हिच्या कथित हुंडाबळीच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कठोर आणि तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. १५ मार्च २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, वरिष्ठ व अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. मृत विवाहिता वैष्णवी हिच्या कुटुंबाला आवश्यक ते संरक्षण व सहकार्य देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, विवाहितेने कोणती सुसाईड नोट लिहिली आहे का, तिचे शेवटचे फोन संभाषण काय झाले होते, तसेच छळासंदर्भातील सर्व बाबींची तपासात सखोल चौकशी करून आवश्यक पुरावे गोळा करावेत, असेही त्यांनी सुचविले आहे. या प्रकरणात आधुनिक फॉरेन्सिक तंत्रांचा वापर करून तपास अधिक प्रभावीपणे करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. हुंड्याच्या मागणीसंदर्भातील वस्तू जप्त करून त्याबाबतचे पुरावे तपासात समाविष्ट करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

तपास पूर्ण करून लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत अशा प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×