Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

हुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई आणखी जवळ; प्रवास सुसाट, सुरक्षितता वाढली

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र दिनाच्या ६७व्या वर्षानिमित्त, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज हुतात्मा स्मारकास भेट देत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या १०६ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राबाबत सेनापती बापट यांच्या ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा’ या वाक्याची आठवण करून देत असत, त्यामुळे महाराष्ट्राचा आधार भारताला आहे आणि तो एकात्मतेच्या दृष्टिकोनातून कायम रहावा त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. कायदा आणि सुरक्षेच्या अमलबजावणी मध्ये जनतेचा सहभाग वाढला पाहिजे असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम – सविस्तर बातमी

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी मिसिंग लिंक बाबत सांगितले की, “आज मिसिंग लिंकच्या उद्घाटनामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. घाटातील वाहतूक कोंडी व अपघातांचा इतिहास आता संपुष्टात येईल. सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने १९९८ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही शहरं जवळ आली. नंतर समृद्धी महामार्गाने संपूर्ण महाराष्ट्र जवळ आला. आता मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई आणखी जवळ येण्याचा मार्ग खुला झाला आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकल्पासाठी विशेष परिश्रम घेतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. “एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत विशेष परिश्रम घेतले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मिसींग लिंकच् ऊद्घाटन हा महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात ही ऐतिहासिक कामगिरी आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र दिनाच्या ६७व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत, उपसभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब यांच्या हस्ते मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘पुरंदर’ येथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी, उपसभापती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच, विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ नीलम गोऱ्हेे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून डॉ. गोऱ्हे यांनी एकात्म महाराष्ट्र आणि राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्धतेचा संदेश दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×