खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

आरोपींविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोयते, गिलवर, दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्चला मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हडपसरमधील लक्ष्मीमाता मंदीराजवळ करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार शेखर काटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात सदाशिव पेठेत इमारतीचा काही भाग काेसळला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुन्हे शाखेच्या युनीट सहामध्ये कार्यरत असून, १७ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण प्रवास करीत असल्याचे त्यांना दिसून आले. संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते, गिलवर असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी एकाचा खून करण्यासाठी प्लॅनिंग केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×