Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा शिवसैनिकांशी संवाद

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा शिवसैनिकांशी संवाद

कार्यकर्त्यांनी मांडल्या प्रभागातील समस्या

marathinews24.com

पुणे – गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील समस्या, संघटनेची बांधिलकी आणि पुढील कृतीयोजना यावर चर्चा केली.

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट – सविस्तर बातमी 

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे जनतेची सेवा हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र सर्वांनी आत्मसात करावा त्याचा विसर पडू देऊ नका. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे महिलांना महत्वाच्या पदांवर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना ही सर्वांना सामावून घेणारी संघटना आहे. सर्वांना सोबत घेऊनच पुढे जायचे आहे. पुण्यात मनासारखे यश मिळाले नसले तरी शिवसेनेने पुन्हा पुण्यात कामाचा शुभारंभ करणे गरजेचे आहे.

श्री रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह इतर सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करावेत. प्रत्येक शिवसैनिकाने आपापल्या भागात सक्रिय राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटावे.” असे नीलमताईंनी सांगितले.

बैठकीत उपस्थित शिवसैनिकांनी डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करताना सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर ठाम राहून व ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या तत्पर कार्यपद्धती प्रमाणे काम करणे गरजेचे आहे. नव्या उत्साहाने पुन्हा विकास व प्रगतीसाठी मैदानात उतरण्यासाठी नव्या संकल्पाने पुढे जाण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शहर संघटक आनंद गोयल, ऊपशहरप्रमुख संजय डोंगर , गायत्री भागवत, महेंद्र जोशी, मीनल धनवटे, अंजली दिघे, संतोष दिघे, सुलक्ष्मी धनकवडे, हिरामण धनकवडे, प्रदीप अवचिते, ऍड. स्नेहल जाधव, एकनाथ ढोले, तुषार भामरे, मीरा तुपेरे, माजी नगरसेवक राहुल तुपेरे, संगीता ठोसर, संजय तुरेकर, हेमंत बत्ते, , पवन बावसकर, माजी जिल्हापरिषद सदस्य शांताराम कटके, सायली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरात शिवसेना संघटना अधिक मजबूत होत असून, आगामी काळात जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर तीव्र लढा देण्याची तयारी शिवसैनिकांनी दाखवली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×