Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल

कालवा फुटल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने

marathinews24.com

पुणे – हडपसर भागात कालवा फुटल्यानंतर मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. हडपसरमधील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहून आले. पाण्याचे लोट रस्त्यावर आल्याने मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर किमान एक ते दोन फूट पाणी साचले. सोलापूर, तसेच अहिल्यानगर रस्त्याने ये-जा करणारी वाहने मगरपट्टा-मुंडवा रस्त्याचा वापर करतात.. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली – सविस्तर बातमी 

त्यानंतर मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. ‘या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, मुंढवा चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावर किमान दहा ते बारा तास पाणी राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

वाहान चालकांसाठी पर्यायी मार्ग

– हडपसर वैदूवाडी चौक – शिंदे वस्ती, शिर्के कंपनी रस्ता, जहाँगीर नगर रस्ता, ताडीगुत्तामार्गे – मुंढवा चौक

– २३ ॲव्हेन्यू माॅल, सोलापूर रस्ता काळूबाई मंदिर चौक – बी. टी. कवडे रस्ता – घोरपडी गाव – पिंंगळे वस्ती – ताडीगुत्ता चौक- मुंढवा चौक
– खराडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग – मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक- घोरपडी रेल्वे उड्डाण पूल – बी. टी. कवडे रस्ता – हडपसर

– मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक – जहाँगीरनगर – शिर्के कंपनी – डाॅ. आंबेडकर चौक – शिंदे वस्ती – वैदूवाडी चौक – हडपसर
– सोलापूर रस्त्याने येणारया वाहनांसाठी मार्ग – १५ नंबर चौक – मांजरी – झेड काॅर्नर – लोणकर वस्ती -केशवनगर – मुंढवा चौक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×