अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड, लोहगावमधील घटना

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

अज्ञात मुलांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला करत अज्ञात मुलांनी बेफाम तोडफोड केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जे.पी. नगर, लेन क्रमांक पाच येथे घडली.

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर छापा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन टोळक्याने ज्येष्ठ नागरिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर लोखंडी वस्तूने घाव घालून नुकसान केले. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांचीही तोडफोड केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी तीन ते चार अज्ञात मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. संबंधित मुलांनी वस्तीमध्ये येऊन कोणत्याही कारणाशिवाय वाहनांची तोडफोड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

फुरसुंगी परिसरातही अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सलग अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने अल्पवयीनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात अल्पवयीनांकडून वाढत्या बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×