Breking News
Jyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्यावसायिकाची ९० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भोसलेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी जानेवारी महिन्यात ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. शेअर बाजराात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यात वेळोवेळी १२ कोटी ३१ लाख रुपये घेतले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यंनी ज्या खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित बंँकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांचे फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे संदेश आल्यास प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×