Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण व विकास योजनांची आढावा बैठक संपन्न

marathinews24.com

पुणे – जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विविध यंत्रणांनी प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अद्याप पूर्ण न झालेली कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ – सविस्तर बातमी

विविध जलसंधारण व विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या. जिओ टॅगिंग बाबत मनरेगा, जि.प. पंचायत विभाग, पुणे यांची असमाधानकारक प्रगती असल्याने त्यांना माहिती अद्यावत करणे व जिओ टॅगिंग तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले. त्रयस्थ संस्थांमार्फत सुरू असलेल्या मूल्यांकन कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत निधी मागणी प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नवीन अशासकीय संस्थांच्या नोंदणी व प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यात यावीत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०) अंतर्गत प्रलंबित कामे एप्रिल अखेर पूर्ण करून देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सुधारित प्रकल्प अहवाल व उपजीविका कृती आराखडा १५ एप्रिलपर्यंत सादर करावा.

जलसंचय जनभागीदारी अंतर्गत सर्व कामे पोर्टलवर अपलोड करावेत. भूसंपादन व वन विषयक प्रस्ताव संबंधित कार्यालयांकडे तात्काळ सादर करावे. जिल्हा व तालुका स्तरावर मृद व जलसंधारण समित्या गठीत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच भविष्यातील कामांसाठी सर्व यंत्रणांनी सविस्तर आराखडा तयार करावा, असे या बैठकीत निर्देश देण्यात आले.

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी अस्तित्वातील को.प. बंधाऱ्यासाठी गेट्स उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांचे परिचलन करणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी नियोजन विभागाकडे विनंती करण्यात येत असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिपक लांडगे यावेळी म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×